नगरसेवकांना ‘स्मार्ट’ धडा, गावठाणातील कामे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:50+5:302021-09-21T04:16:50+5:30
स्मार्ट सिटीचे यापूर्वीचे सीईओ प्रकाश थवील यांच्या बदलीनंतर कामकाजात सुधारणा झालेली नाही. गावठाण भागात अत्यंत चुकीचे रस्ते तयार करण्यात ...

नगरसेवकांना ‘स्मार्ट’ धडा, गावठाणातील कामे बंद
स्मार्ट सिटीचे यापूर्वीचे सीईओ प्रकाश थवील यांच्या बदलीनंतर कामकाजात सुधारणा झालेली नाही. गावठाण भागात अत्यंत चुकीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. रस्त्याला उतार देण्यात आल्याने पुराबरोबरच अन्य समस्याही तयार होणार असून पारंपरिक रामरथावर निघणाऱ्या गरूढ रथाला या भागात येणे शक्य होणार नाही. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होणार असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी केला आहे. कंपनीची मनमानी इतकी वाढली आहे की त्यांनी नगरसेवक तक्रार करतात म्हणून कामे थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात केंद्र शासनाकडे तक्रार करावी असे त्यांनी सांगितले तर याचवेळी रस्त्याच्या कामाचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही खैरे यांनी सांगितले.
इन्फो...
महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील कंपनीच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. सीईओ थवील यांच्या बदलीनंतरही पुन्हा तोच कारभार सुरू असेेल तर ही बाब चुकीची असल्याचे सतीश कुलकर्णी यांनी सांगितले व या प्रकरणी मंगळवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता आयुक्तांच्या दालनात बैठक बोलावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.