वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील झोपडपट्टी मनपाने हटविली
By Admin | Updated: January 2, 2017 01:00 IST2017-01-02T01:00:30+5:302017-01-02T01:00:45+5:30
कारवाई : २५ झोपड्या जमीनदोस्त; तक्रारीची घेतली दखल

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील झोपडपट्टी मनपाने हटविली
नाशिक : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील इको सिटी सेंटरसमोरील मनपाच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे वसलेली झोपडपट्टी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी हटविली. ‘लोकमत’ने सदर अतिक्रमणासंबंधीचे वृत्त दि. २१ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिकेने सदर मोहीम राबविली.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील पार्कसाइड रेसिडेन्सीलगत महापालिकेच्या जागेवर सुमारे २० ते २५ झोपड्या वसल्या होत्या. महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर कोणतीही विकास योजना न राबविण्यात आल्याने भूखंडावर अतिक्रमण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून या झोपड्यांमध्ये भरच पडत होती. या झोपडीधारकांचा आजूबाजूच्या रहिवाशांना प्रचंड त्रास होत होता. (प्रतिनिधी)