शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

फटाके विक्रेत्यावर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 3:55 PM

चांदवड (महेश गुजराथी) - चांदवड येथील फटाके विक्रेत्यांवर मंदीचे सावट आल्याने लाखो रुपयाचा फटका या विक्रेत्यांना बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशासनाने प्रारंभी फटाके विक्रीवरच बंदी घातली होती त्यात जागेचा घोळ यामुळे फटाके विक्रेत्यांना दुकाने लावण्यास प्रशासनाने ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधीच परवानगी दिली

चांदवड (महेश गुजराथी) - चांदवड येथील फटाके विक्रेत्यांवर मंदीचे सावटआल्याने लाखो रुपयाचा फटका या विक्रेत्यांना बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाने गेल्याच वर्षी जिल्हाधिकारी यांनी वर्षानुवर्षे नकाशा प्रमाणे ठरवुन दिलेल्या जागा उपलब्ध न करुन दिल्याने फटाके विक्रेत्यांना या जागेवर बसु न दिल्याने यंदाच्या वर्षी फटाके विक्रेत्यांना मोठा फटका बसल्याचे बोलले जात असून तर शासनाने नियमानुसार सुमारे १९ ते २० दुकानदारानी फटाके विक्रीचा तात्पुरता परवाना काढण्याचे दरवर्षी प्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.तर प्रशासनाने गेल्याच वर्षी आठवडे बाजारातील वर्षानुवर्षापासूनची परपंरागत जागा बदल्याने फटाके विक्रीचा व्यवसाय पाहिजे तसा होत नाही त्यामुळे लाखो रुपयाचा माल पडून राहण्याची चिन्ह दिसून येत आहे. त्यात यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती, नोटबंदी , जीएसटी. व फटाक्यावरील बंदी शासनाने घातल्याने या फटाके विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यातच विविध शाळामधुन प्रदुर्षण व आवाजविरहित फटाके यांची शपथ हेही या फटाके विक्रीवर मंदीचे सावट दिसून आल्याने अनेक व्यापाऱ्यानी कर्जाने पैसे काढून फटाके विक्री साठी माल भरला मात्र तो अंगावर पडून राहण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान नगरपलिका प्रशासनाने फटाके विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात कर वसुल करुन ही त्यांना पाहिजे ती जागा न देता त्यांच्या पुढे सोमवारी आठवडेबाजारातील अनेक विक्रेत्यांनी फटाके विक्रेत्यांच्या पुढे इतर दुकानदारांना बसू दिल्याने त्यांनाही फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. तर अतिक्रमण धारक हे विना परवाना वर्षभर या जागेवर बसत असून अवघ्या आठ दिवसाकरिता फटाके विक्रेते जागा मागतात त्यांना जागा न देता प्रशासनाने कर घेऊनही लक्ष न दिल्याने या फटाके विक्रेत्यांचा माल अंगावर पडून राहिला याबाबत विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर फटाके विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात परवाना खर्च ,इतर मंडप खर्च, लाईट खर्च करुन या मंदीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने अधिकच नाराजी व्यक्त केली त्यात सर्वत्र मंदीचे सावट होते नवरात्र उत्सवातही मंदीमुळे अनेक व्यापाºयांनी नाराजी व्यक्त केली होती. व आता दिवाळीतही फटाके विक्रेत्यावर संक्रात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.यंदाच्या वर्षी दिवाळी सणावर दुष्काळी सावट आल्याने सर्वच व्यावसाईकांवर मंदीचा फटका बसल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.चांदवड येथील आठवडेबाजारात शिराई, पणती,लाह्या बत्तासे,झेंडूंची फुले, व आकाश कंदील यांची विविध दुकाने थाटली होती मात्र सर्वत्र मंदीचे चित्र दिसून आले.