निरगुडे येथील सरपंचांच्या आंबा बागेची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:27+5:302021-09-18T04:16:27+5:30

सरपंच तुंगार यांनी अतिशय मेहनतीने तीन वर्षांपासून इस्रायल पद्धतीने आंबा लागवड बाग तयार केली होती. परंतु ...

Slaughter of Sarpanch's mango orchard at Nirgude | निरगुडे येथील सरपंचांच्या आंबा बागेची कत्तल

निरगुडे येथील सरपंचांच्या आंबा बागेची कत्तल

सरपंच तुंगार यांनी अतिशय मेहनतीने तीन वर्षांपासून इस्रायल पद्धतीने आंबा लागवड बाग तयार केली होती. परंतु अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास बागेत कुणीही नसल्याचा फायदा घेत शेकडो झाडांची बुंध्याला कत्तल करून बाग भुईसपाट केली आहे. त्यामुळे सरपंच प्रवीण तुंगार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कत्तल केलेल्या बागेला आमदार हिरामण खोसकर यांनी भेट देऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे.

कोट...

रात्री अज्ञातांनी माझ्या आंबाबागेतील ३५० पेक्षा जास्त आंबा झाडांची कत्तल केली असून मोठे नुकसान केले आहे. तोडणाऱ्या व्यक्तींचा शोध होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व मला नुकसानभरपाई मिळावी.

- प्रवीण तुंगार (सरपंच निरगुडे)

170921\1933-img-20210917-wa0028.jpg

बागेची पाहणी करताना आमदार हिरामण खोसकर

Web Title: Slaughter of Sarpanch's mango orchard at Nirgude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.