जनावरांची कत्तल; सहा जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 01:34 IST2019-12-07T01:33:11+5:302019-12-07T01:34:13+5:30
चार जनावरांची कत्तल करून तीन जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

जनावरांची कत्तल; सहा जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : चार जनावरांची कत्तल करून तीन जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वरळी रोडवर मो. मुस्तफा याच्या पत्र्याच्या गुदामावर छापा टाकून विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी अभिजित साबळे यांनी फिर्याद दिली. एक लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तरुणास पळवून नेल्याची तक्रार
मालेगाव : कोपरगाव येथील आत्मा मालिक आश्रमशाळेत शिकत असलेला दिगंबर अरविंद शेवाळे (वय १७ वर्ष ३ महिने) हा मोची कॉर्नर येथे मित्रास भेटण्यास आला असता त्यास कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद वडील अरविंद बारकू शेवाळे (४२) यांनी छावणी पोलिसांत दिली. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिगंबर हा त्याचा मित्र उमेश खैरनारला भेटून गेला तो परत आलाच नाही. अधिक
तपास हवालदार निकम करीत आहेत.