वादातून युवकावर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:19 IST2018-06-06T01:19:40+5:302018-06-06T01:19:40+5:30

नाशिक : वीस दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चौघा संशयितांनी एका १९ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार करून भोसकल्याची घटना सोमवारी (दि. ४) दुपारी हिरावाडीतील (अयोध्यानगरी) परिसरात घडली.

Skirmish on the young man from the promise | वादातून युवकावर चाकूने वार

वादातून युवकावर चाकूने वार

ठळक मुद्देक्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार

नाशिक : वीस दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चौघा संशयितांनी एका १९ वर्षीय तरुणावर
धारदार चाकूने वार करून भोसकल्याची घटना सोमवारी (दि. ४) दुपारी हिरावाडीतील (अयोध्यानगरी) परिसरात घडली.
या घटनेत त्रिकोणी बंगल्याजवळील अर्णव सोसायटीत राहणारा तुषार रवींद्र सावंत हा गंभीर जखमी झाला आहे. तरुणावर वार केल्यानंतर संशयित दुचाकीवरून पसार झाले. हिरावाडीतील (अयोध्यानगरी) परिसरात राहणाऱ्या तुषार सावंत व विशाल जाधव यांच्यात २० दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता.
सोमवारी (दि.४) दुपारी साडेतीन वाजता सावंत हा परिसरात असताना संशयित आरोपी विशाल ऊर्फ पप्या वाघमारे, विशाल जाधव, साई बेलाडकर, भोला भडांगे (सर्व राहा. हिरावाडी) आदींनी दुचाकीवरून येऊन सावंत याच्यावर चाकूने वार केले.

Web Title: Skirmish on the young man from the promise

टॅग्स :Crimeगुन्हा