साठ वर्षांनंतर मुंगसरे शिवरस्त्याचा ‘मार्ग मोकळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:30 PM2019-03-13T23:30:22+5:302019-03-14T00:05:41+5:30

साठ वर्षांनंतर अखेर मुंगसरे शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकरी व गावकरी वर्गात समाधानाचे व आनंदाच्या वातावरणात कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली.

 Sixty years later, the 'mugsare' of the mungsare | साठ वर्षांनंतर मुंगसरे शिवरस्त्याचा ‘मार्ग मोकळा’

साठ वर्षांनंतर मुंगसरे शिवरस्त्याचा ‘मार्ग मोकळा’

Next

मातोरी : साठ वर्षांनंतर अखेर मुंगसरे शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकरी व गावकरी वर्गात समाधानाचे व आनंदाच्या वातावरणात कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली.
गेल्या साठ वर्षांपासून मुंगसरे ते मातोरी गावाला जोडणारा रस्ता बंद होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्र मणे करून रस्ता काबीज केला होता. हा रस्ता जवळपास नामशेष झाला होता; परंतु मुंगसरे गावातील नागरिकांना प्रवासासाठी, तर शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी मुंगसरे फाटा येथे एक ते दीड किलोमीटर यावे लागत असे. याबाबत पाच महिन्यांपूर्वी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. स्थानिक शेतकºयांनी अनेक वर्षं शासकीय कार्यालयात पाठपुरावा केला, शेवटी आपणच पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्त करू असा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला असता याबाबतची दखल मुंगसरे गावच्या सरपंचांनी घेतली व याबाबतचा अहवाल शासन दरबारी सादर केला असता तुटपुंजा निधी का होईना मिळाला. निदान शेतकºयांना हातभार लागला. यावेळी तानाजी पिंगळे, सरपंच कल्पना भोर, बाळासाहेब म्हैसधुणे, कैलास पिंगळे, हिरामण पिंगळे, बाबूराव पिंगळे, शिवाजी भोर, दशरथ हगवणे, केरुतात्या हगवणे, राजाराम फडोळ, शिवाजी पिंगळे, शेखर पिंगळे, सुखदेव पिंगळे आदी उपस्थित होते.
रस्त्याचा फायदा कोणाला होईल?
रस्त्याचा फायदा हा शालेय विद्यार्थ्यांना थेट हायवेवर जावे लागणार नाही त्यामुळे अपघात होण्याचा धोका कमी होईल, नाशिक ते मुंगसरे अंतर सुमारे पाच किलोमीटरने कमी होईल. शेतकरीवर्गाला भाजीपाला शेतमाल वाहतुकीसाठी फायदा होईल. अत्यावश्यक सुविधांसाठी दीड किलोमीटर दूर फाट्यावर जावे लागणार नाही.
गावातील शिव रस्ता गेल्या साठ वर्षांपासून बंद व अतिक्रमित अवस्थेत होता. गावाबाहेरून जाणारा हायवेच वापरायचा झाल्याने ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले होते. मोठ्या परिश्रमाने व पाठपुराव्याने आम्हाला रस्ता सुरू करण्यात यश आले आहे.
- राजाराम फडोळ, ग्रामस्थ
अनेकदा निवेदने दिली; पण कोणीही लक्ष देत नसल्याने आमचा रस्ता दुर्लक्षित झाला होता. अर्जदेखील दिले, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले पण दीड महिन्यानी दखल घेत अधिकारी आमच्यापर्यंत आले होते आणि आता कामाला सुरुवात केली आहे.  - प्रभाकर पिंगळे, शेतकरी

Web Title:  Sixty years later, the 'mugsare' of the mungsare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.