शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत मानसिकतेत षटकार मारल्याचा आनंद

By admin | Updated: February 26, 2017 00:03 IST

पराभूत मानसिकतेत षटकार मारल्याचा आनंद

नाशिक : सत्तेची कवचकुंडले गळून पडल्यावर काय अवस्था होती, हे पहायचे असल्यास सध्याच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या परिस्थितीचे अवलोकन करावे लागेल. पाच वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून कॉँग्रेसला झिडकारणाऱ्या राष्ट्रवादीला यंदाच्या निवडणुकीत त्याच कॉँग्रेससोबत फरफटत जाण्याशिवाय जसा पर्याय उरला नाही, तसेच या पक्षाला नजीकच्या काळात सहमतीचे राजकारण करूनच येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.  नाशिक महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसची पराभूत मानसिकता होती, त्यामुळे या पक्षाचे नेते स्वबळाची भाषा जरी करीत असले तरी, महापालिकेच्या सर्व प्रभागात उमेदवार तरी मिळतील काय, असा कळीचा प्रश्न खासगीतही ते नाकारत नव्हते. त्यामुळेच की काय समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर प्रदान करण्यात आले. अर्थात ही सारी तयारी निवडणुकीच्या घोषणेनंतरची असली तरी, तत्पूर्वी पक्षाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या स्थानिक नेतृत्वात बदल करून शिडात हवा भरण्याचा प्रयोग करण्यात आला. पक्षावर एकहाती पकड ठेवणारे छगन भुजबळ, समीर भुजबळ भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुरुंगात गेल्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावर दोन पावले मागे सरकलेल्या राष्ट्रवादीला घरघर लागल्याचे पाहून अनेकांनी सोडचिठ्ठी देत सोयीच्या राजकारणासाठी दुसरा घरोबा तर केलाच, परंतु पक्ष सत्तेची फळे चाखत असताना त्यात सामील होऊन स्वत:च्या तुंबड्या भरण्यात अग्रेसर असलेल्यांनीदेखील पक्षापासून फारकत घेतली. पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीच पक्षाकडे पाठ फिरविल्याने कार्यकर्ते तरी कसे टिकतील, असा प्रश्न ज्यावेळी उभा राहिला, त्याचवेळी पक्षाच्या नेतृत्वात बदल करून रंजन ठाकरे या तरुण कार्यकर्त्याकडे पक्षाची धुरा सोपविण्यात आली. पक्षाच्या जुन्या व ज्येष्ठ नेते तसेच नवीन कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून पक्षात चैतन्य निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होत नाही तोच निवडणुकीचे नगारे वाजल्याने दुहेरी कर्तव्य बजावण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे पक्षाची ताकद ओळखूनच ठाकरे यांनी कॉँग्रेसशी निवडणूकपूर्व युती करण्याची पावले टाकली, ते केल्यानेच पक्षाला सहा जागांवर यश मिळविता आले.  केंद्रात व राज्यातून मतदारांनी झिडकारलेल्या राष्ट्रवादीने गेल्या पंचवार्षिकमध्ये महापालिकेत कोणत्या ना कोणत्या कारणाने सत्तेत आपला सहभाग नोंदविला असल्यामुळे महापालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे तसे अवघड होते, त्यामुळेच की काय नोटबंदी हाच एकमेव मुद्दा घेत राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरे गेली. त्यातून किती यश मिळाले हे सर्वांच्या समोर असले तरी, प्रतिकूल परिस्थितीतून राष्ट्रवादीने मिळविलेले यश पक्षाला आजही पुरेसे वाटू लागले आहे, कारण पक्षाच्या विद्यमान २० नगरसेवकांपैकी सहा जणांनी दुसरा घरोबा केला तर पाच जणांनी उमेदवारी न करण्यात धन्यता मानली. उर्वरित आठ जणांनी पुन्हा रिंगणात उडी घेतल्यामुळे आलेल्या सहा जागांमुळे पक्षाने षटकार ठोकल्याचा आनंद आहे.