शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे ४०० जवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:55 IST

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीसाठी कोलकाता येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाल्या आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक दक्षता : सीआयएसएफच्या दोन तुकड्या दाखल

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीसाठी कोलकाता येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाल्या आहेत. तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे एकूण ४०० जवानदेखील निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी लवकरच शहरात येणार असल्याची माहित्री सूत्रांनी दिली.शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रांचे मिळून सुमारे १ हजार १५४ बूथ आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. या सर्व बूथनिहाय पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापसांत चर्चा करून देण्यात आलेला बंदोबस्त तैनात करणार आहेत. निवडणुकीचे मतदान शहरात सर्वच केंद्रांवर शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. सर्वाधिक संवेदनशील केंद्रे भद्रकाली व पंचवटी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असून, या भागात पोलिसांकडून सशस्त्र पथसंचलनदेखील केले जात आहे.केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)चे जवान निवडणूक बंदोबस्तासाठी शहरात दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था नियमानुसार आयुक्तालयाकडून करण्यात आली असून, बंदोबस्तासाठी त्यांना अतिरिक्त वाहनेही पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.असा आहे फौजफाटा२५४ इमारतींमधील केंद्रांच्या १ हजार १५४ बूथवर ७३५ पोलीस शिपाई, ५७७ होमगार्ड बंदोबस्तावर राहणार आहेत. याव्यतिरिक्त निवडणूक काळात व प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सहा उपआयुक्त, १९ सहायक आयुक्त, ७० पोलीस निरीक्षक, २०० सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, १९८ पुरुष शिपाई, सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई ३ हजार, ७०० होमगार्ड असा चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकPoliceपोलिस