येवल्यात सहा नवीन बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 00:38 IST2021-10-28T00:38:11+5:302021-10-28T00:38:59+5:30
येवला तालुक्यातील सहा संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी, (दि. २७) पॉझिटिव्ह आले आहेत.

येवल्यात सहा नवीन बाधित रुग्ण
येवला : तालुक्यातील सहा संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी, (दि. २७) पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आजपर्यंत २९६ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६२३४ झाली असून यापैकी ५८८१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्य:स्थितीत ॲक्टिव्ह (बाधित) रुग्ण संख्या ५९ इतकी आहे.