नाशिक : राज्यात सुमारे अडीच लाख सहकारी संस्था असून, यात जवळपास एक लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. परंतु, महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या १९६० चा सहकार कायदा अन्य सहकारी संस्थांच्या तुलनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अडचणीचा आणि क्लिष्ट ठरत असल्याने राज्यात केवळ गृहनिर्माण संस्थांसाठी येत्या सहा महिन्यांत स्वतंत्र कायदा अस्तित्वात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी नाशिक येथे दिली. नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. २१) सहकारी गृहनिर्माण/हौसिंग संस्थ्यांच्या सदस्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त विभागीय उपनिबंधक ए. एम. मोरे, सूर्यभान पाटील, राजू देसले, प्रिया दळणार आदी उपस्थित होते. यावेळी रेराच्या धर्तीवर स्वतंत्र प्राधिकरणही निर्माण केले जात असून, त्यासाठी १० सदस्यीय समितीची स्थापनाही करण्यात आल्याचे रमेश प्रभू यांनी सांगितले. रमेश प्रभू म्हणाले, प्राधिकरणकडे येणाºया सोसायटीच्या तक्र ारीबाबत ६० दिवसांच्या आत निर्णय देणे आवश्यकच असणार असून, कायद्यानुसार सोसायट्यांचे आॅडिट करणे, निवडणूक घेणे आदी बाबी या बंधनकारक असणार आहे. २०० पेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका संस्था स्तरांवरच घेता येणार असल्याचे स्पष्ट करतानाच २०० पेक्षा अधिक सभासद असलेल्या सोसायट्यांना मात्र प्राधिकरणाच्या नियंत्रणातच निवडणुका घेणे बंधनकारक होणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. दरम्यान, विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाºयांनी विचारलेल्या शंकांचे रमेश प्रभू यांनी निरसन केले. नाशिकच्या पदाधिकाºयांची घोषणा रमेश प्रभू यांनी मेळाव्यात महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनच्या नाशिक शाखेचे मेळाव्याच्या निमित्ताने उद्घाटन झाल्याचे जाहीर करतानाच या शाखेच्या अध्यक्षपदी अरविंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली, तर सचिवपदी प्रकाश गायकर व खजिनदार म्हणून अशरफ अली यांची नेमणूक करण्यात आली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांबाबतच्या समस्या व अडचणींबाबत व त्या सोडविण्यासाठी ही समिती मोफत मार्गदर्शन करणार असल्याचे प्रभू यांनी जाहीर केले.
सहा महिन्यांत स्वतंत्र सहकारी गृहनिर्माण कायदा येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:23 IST