चोरट्यांकडून सहा मोबाइल जप्त

By Admin | Updated: June 12, 2017 01:13 IST2017-06-12T01:13:07+5:302017-06-12T01:13:47+5:30

चोरट्यांकडून सहा मोबाइल जप्त

Six mobile seized from thieves | चोरट्यांकडून सहा मोबाइल जप्त

चोरट्यांकडून सहा मोबाइल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आडगाव पोलिसांनी मोबाइल चोरट्यांचा शोध घेत त्यांच्याकडून चोरीचे ३९ हजार रुपयांचे सहा महागडे मोबाइल फोन जप्त केले आहेत़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शहरातील वाढत्या मोबाइल चोरीच्या घटना रोखण्यासाठी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते़ या आदेशानुसार आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांना काही मोबाइल चोरट्यांची माहिती मिळाली होती़ त्यानुसार चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ४ सॅमसंग, १ आसूस व १ लिनेओ असे ६ महागडे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़ या चोरट्यांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्यांचे मोबाइल हरविले असतील त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

Web Title: Six mobile seized from thieves