सहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
By Admin | Updated: January 30, 2017 00:31 IST2017-01-30T00:31:13+5:302017-01-30T00:31:26+5:30
सहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर

सहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
नाशिकरोड : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार निवडीसाठी ठरवलेल्या कोर कमिटी सदस्यांचा अहवाल संपर्क प्रमुखाकडे सादर करण्यात आल्याने पक्षप्रमुख व इतर वरिष्ठ नेते त्यावर विचार करून बुधवारनंतरच शिवसेनेची उमेदवारांची घोषणा होणार आहे. कोर कमिटीच्या सदस्यांनी दिलेल्या अहवालामुळे वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मनपाच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपर्कप्रमुख अजय चौधरी, उपनेते बबन घोलप, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे, सुधाकर बडगुजर, राजू लवटे यांची मनपा निवडणूक उमेदवार ठरवण्यासाठी विभागनिहाय कोर कमिटी स्थापन करण्यात आली होती, यातील काही पदाधिकाऱ्यांना संपूर्ण ३१ प्रभागांचा अहवाल देण्यास सांगितला होता. त्यामध्ये सर्वांचे अहवाल संपर्कप्रमुख अजय चौधरी यांच्याकडे सुपूर्द झाले आहेत. अजय चौधरी हे स्वत:चा व या सर्वांचा अहवाल शिवसेनचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे देणार आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वरिष्ठ नेते व स्थानिक कोर कमिटी सदस्यांची सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेऊन उमेदवारी निश्चत करणार असल्याचे समजते. कोर कमिटीच्या सदस्यांनी ज्याला ए प्लस व ए असे काम दिले असतील त्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या नावांवर तिढा निर्माण होईल ती यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली जाणार आहे.