रमजानपुरा भागातून सहा जनावरे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:51 IST2020-07-28T21:23:37+5:302020-07-29T00:51:02+5:30
मालेगाव मध्य : रमजानपुरा भागातील गुलशन-ए-फारान परिसरात कत्तलीच्या उद्देशाने पत्र्यांच्या शेडमध्ये डांबून ठेवलेली ९० हजार रुपये किमतीची सहा जनावरे पोलिसांनी जप्त केली.

रमजानपुरा भागातून सहा जनावरे जप्त
ठळक मुद्देजमील अहमद फरार आहे़
मालेगाव मध्य : रमजानपुरा भागातील गुलशन-ए-फारान परिसरात कत्तलीच्या उद्देशाने पत्र्यांच्या शेडमध्ये डांबून ठेवलेली ९० हजार रुपये किमतीची सहा जनावरे पोलिसांनी जप्त केली. पोलीस नाईक बिपीन ठाकूर यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी जमील अहमद मोहंमद आमीन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रमजानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस नाईक बिपीन ठाकूर, पोलीस हवालदार वाघचौरे, चालक जलील शेख यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास गुलशन - ए - फारान परिसरात छापा टाकून ही कारवाई केली. जमील अहमद फरार आहे़