सिटूचे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:40 IST2020-09-23T23:30:35+5:302020-09-24T01:40:00+5:30
सातपूर :-कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोदी सरकारने कामगार,शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात अनेक अध्यादेश व कायदे आणले व कामगार व जनतेनी गेल्या 100 वर्षांत लढून मिळवलेले अधिकार नष्ट केले.केंद्रसरकरच्या या जनविरोधी धोरणांच्या विरोधात सिटूच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले.कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सिटू युनियनच्यावतीने आंदोलन करतांना सीताराम ठोंबरे,संतोष काकडे,तुकाराम सोनजे,कल्पना शिंदे,अँड भूषण सातळे, संजय पवार,एन.डी.सूर्यवंशी,मोहन जाधव, गौतम कोंगळे, आदी
सातपूर :-कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोदी सरकारने कामगार,शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात अनेक अध्यादेश व कायदे आणले व कामगार व जनतेनी गेल्या 100 वर्षांत लढून मिळवलेले अधिकार नष्ट केले.केंद्रसरकरच्या या जनविरोधी धोरणांच्या विरोधात सिटूच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले.कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
कोविड चाचणी मोफत करावी,रुग्णांवर मोफत उपचार करावेत,गरजूंना मोफत रेशन मिळावे,मनरेगा मार्फत कामे मिळवीत,बेरोजगारांना 10 हजार बेरोजगार भत्ता मिळावा,शेतकरी विरोधी चारही अध्यादेश मागे घेण्यात यावेत,वेतन कपात,कामगार कपातीवर बंदी घालण्यात यावी,सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण/विक्री रद्द करण्यात यावी,नवे शैक्षणिक धोरण मागे घेण्यात यावे, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे,सिटू जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांना दिलेली तडीपारीची नोटीस मागे घेण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्'ात राष्ट्रीय सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड,जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे,संतोष काकडे,तुकाराम सोनजे,कल्पना शिंदे,अँड भूषण सातळे,एन.डी.सूर्यवंशी,मोहन जाधव, गौतम कोंगळे,संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हातात लाल झेंडे व मागण्यांचे फलक घेऊन कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.