शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

झोडगे येथील ग्रामीण रुग्णालयात रूग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 9:32 PM

झोडगे : येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून त्यांची आर्थिक पिळवणूक करून त्रास दिला जात आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकारी व परिचारिका मनमानी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कझोडगे : येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात रूग्णांची हेळसांड होत असून त्यांची आर्थिक पिळवणूक करून त्रास दिला जात आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, झोडगे येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व परिचारिका मनमानी कारभार करीत आहेत. त्यामुळे रूग्णांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. दवाखान्यातील डॉक्टर रात्री - अपरात्री गरोदर महिलांना सोयसुविधा उपलब्ध करुन देत नाहीत, शिवाय अरेरावी करतात. गावात शासकीय रूग्णालयाची सुविधा असतांनाही नाईलाजास्तव गरोदर महिलांना प्रसुतीसाठी खासगी रूग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागत आहे.शासनाच्या विविध योजना असून त्याचा कोणताही लाभ झोडगेग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गावातील रूग्णांना मिळवून देत नाही. दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका गैरहजर असतात. ग्रामीण भागात सर्पदंश, विंचू दंश, विषारी औषधांच्या फवारणीमुळे होणारा त्रास यासारख्या घटना घडतात. येथे कुठलीही औषधे उपलब्ध नसल्यामुळे सरकारी दवाखाना असूनही ते शोभेचे बाहुले झाले आहे. मालेगावी जाण्यासाठी वाहनांची सुविधा नसल्यामुळे रूग्णांचे हाल होतात. सोनोग्राफीची सुविधा नसल्यामुळे जास्तीचे पैसे देवून खासगी रूग्णालयात प्रसुती करावी लागते.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल