कामगार उपआयुक्त कार्यालयावर सिटूतर्फे निदर्शने.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:56+5:302021-06-26T04:11:56+5:30

स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दि. १२ ते दि. २३ मेदरम्यान लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे कामगारांना घरी राहावे लागले ...

Situ protests at the office of the Deputy Commissioner of Labor. | कामगार उपआयुक्त कार्यालयावर सिटूतर्फे निदर्शने.

कामगार उपआयुक्त कार्यालयावर सिटूतर्फे निदर्शने.

स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दि. १२ ते दि. २३ मेदरम्यान लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे कामगारांना घरी राहावे लागले होते. या काळातील वेतन देण्याबाबतचे शासनाकडून कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. तरी या काळातील संपूर्ण वेतन कामगारांना मिळावे व त्यांचा ५० लाख रुपयांचा विमा काढण्यात यावा, कंपनी आवारात कामगारांसाठी मोफत लस मिळण्याची सोय करावी, ज्या कामगारांनी या काळात काम केले आहे त्यांना एक हजार रुपये प्रतिदिन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, कामगार कर्मचारी बाधित झाल्यास त्याचा संपूर्ण खर्च कंपनीने करावा. कोरोनाच्या आजारामुळे कामगार कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मिळावेत, फॅब कंपनीतील बेकायदेशीरपणे कमी केलेल्या सर्व स्थानिक कामगारांना त्वरित कामावर घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी सिटूचे जिल्हा अध्यक्ष सीताराम ठोंबरे, दिनेश सातभाई, संतोष काकडे, मोहन जाधव आदींनी मार्गदर्शन केले.

(फोटो २५ सिटू) : कामगारांना लॉकडाऊन काळातील वेतन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सिटू युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आंदोलन करताना कामगार.

Web Title: Situ protests at the office of the Deputy Commissioner of Labor.