शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:07 IST

नांदगाव : तालुक्यातील वाखारी येथील हत्याकांडाच्या घटनेला बावीस दिवस उलटले असूनही पोलिसांच्या तपासातून काहीच निष्पन्न होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देवाखारी हत्याकांड : घटनेची चौकशी करण्याची मागणी

नांदगाव : तालुक्यातील वाखारी येथील हत्याकांडाच्या घटनेला बावीस दिवस उलटले असूनही पोलिसांच्या तपासातून काहीच निष्पन्न होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. तपासाच्या नावाखाली मारहाण झाल्याचा आरोपही पोलिसांच्या उपस्थितीतच करण्यात आला. दरम्यान हत्याकांडाबाबत योग्य ती माहिती देणााºयास बक्षिसाची रक्कम एक लाख करण्यात आली. तपास अधिकारी समीरसिंग साळवे यांनी याअगोदरच्या पंचवीस हजाराऐवजी एकावन्न हजारांचे बक्षीस जाहीर केले होते, मात्र आमदार सुहास कांदे यांनी या बक्षिसाच्या रकमेत स्वत:चे पन्नास हजार रुपये दिल्याने आता माहिती देणाºयास एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.शुक्रवारी सकाळी गावातील छत्रपती शिवाजी चौकात गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी अतिरिक्त पोलिसांची कुमुक बंदोबस्ताला मागविली होती संजय चव्हाण यांनी आंदोलांमागची भूमिका स्पष्ट केली पोलिसांच्या कार्यपद्धती विरोधात दादा कल्पना आहिरे ललिता शिंदे रमेश चव्हाण श्रावण देवरे किशोर चव्हाण मेघराज काकळीज भारत चव्हाण बाळू काकळीज यांची मनोगते यावेळी झालीत हत्याकांड होऊन बावीस दिवस झाले..अद्याप गावकरी दहशतीखाली वावरत आहेत. चौकशीच्या नावाखाली निरापराध गावक-यांना मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप गावकरी पोलीसांवर करत आहेत.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, समोर येऊन माहिती द्यावी. लवकरच आरोपी सापडेल जातील. सहकार्य करावे.- समीरसिंग साळवेउपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड

हत्याकांडासारखा प्रकार घडल्यावरदेखील पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली नाही. ज्यांच्यावर तालुक्याची जबाबदारी असे तालुका दंडाधिकारी साधे ग्रामस्थांना भेटीला आले नाहीत. या प्रकारावरून यंत्रणेला किती गांभीर्य आहे, याची कल्पना यावी.- संजय चव्हाण, नागरिक

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस