श्रमजीवी संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:50 IST2020-07-28T21:12:57+5:302020-07-29T00:50:13+5:30
पेठ : तालुक्यातील शिधापित्रकेपासून वंचित असलेल्या नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळावी, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पेठ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

श्रमजीवी संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन
पेठ : तालुक्यातील शिधापित्रकेपासून वंचित असलेल्या नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळावी, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पेठ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून तत्काळ शिधापत्रिका मिळावी या मागणीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार संदीप भोसले यांच्याशी विविध मागण्यांबाबत चर्चा करून जुलै महिना अखेरपर्यंत शिधापत्रिका देण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सेक्रे टरी भगवान मधे, तालुकाध्यक्ष मुरलीधर कनोजे, कांतीलाल खोटरे, कमलेश वाघमारे यांच्यासह वंचित शिधापत्रिकाधारक उपस्थित होते. तालुक्याच्या बहुतांश भागातील विशेषकरून कातकरी समाजातील कष्टकरी, शेतमजूर कुटुंबांना जवळपास ९७० कुटुंबांना शिधापत्रिकाच नसल्याने त्यांना अन्नधान्यासह विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते आहे. अनेक नागरिकांची शिधापत्रिका गहाळ होणे, जीर्ण होणे असे प्रकार घडल्याने नवीन शिधापत्रिकेसाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केले आहेत.