शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

सिन्नरला सहा वाजेनंतर कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:59 IST

सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी ६ वाजेनंतर कर्फ्यू राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी ६ वाजेनंतर कर्फ्यू राबविण्यात येणार आहे.व्यापारी व व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले. नियम मोडणारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन कोकाटे यांनी माहिती दिली. सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहु पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड,  नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, स्टाइसचे चेअरमन पंडितराव लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सिन्नरकरांना आरोग्य आणि इतर सुविधांच्या बाबतीत गैरसोयींना सामोरे जावे लागणार नाही याबाबत आपण दक्ष आहोत. मात्र नागरिकांनी स्वत:च्या भवितव्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे जेणेकरून पुढील काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शहरातील सर्व दुकाने बंद राहणार सिन्नर शहरात व तालुक्यात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने व्यापारी संघटनेने शनिवारपर्यंत चार दिवस जनता कर्फ्यू राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून शहरातील सर्व दुकाने बंद असणार आहे. या बंदमधून दूध विक्रेते, औषध विर्क्रेते व दवाखाने यांना वगळण्यात आले आहे. या बंदची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज भगत यांनी केले आहे.पार्किंग झोन उभारुन शहरात नाकाबंदीसिन्नर शहरात ये-जा करण्यासाठी तीन ते चार रस्ते खुले ठेवणार आहेत. वाहनचालकांनी पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करुन खरेदीसाठी यावे. विनाकारण गावात फिरणाºया वाहनचालकांवर पोलीस कडक कारवाई करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. शहरात नाकाबंदी करुन कारवाई केली जाणार आहे.सिन्नर शहरात सकाळी ९ ते ५ या वेळेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याच्या तसेच शहराबाहेर वाहनतळांचे नियोजन करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या असून, त्याची लागलीच अंमलबजावणी केली जाणार आहे. जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घेणे भाग पडत आहे.- माणिकराव कोकाटे, आमदार

टॅग्स :sinnar-acसिन्नरcorona virusकोरोना वायरस बातम्या