‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिमेंतर्गत सिन्नरला पालकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 17:46 IST2020-02-18T17:45:36+5:302020-02-18T17:46:18+5:30
सिन्नर : येथील विद्यावर्धिनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिमेंतर्गत सिन्नरला पालकांचा सत्कार
आदल्या दिवशी मंदिरासमोर होमहवन करून ‘श्री’च्या पादुकांचा महाभिषेक करण्यात आला. सकाळी ‘श्रीं’चे चक्री पारायण करण्यात आले. श्रींच्या पादुकांचा पालखी सोहळा विजयनगर, खर्जेमळा, कोठूरकरमळा या मार्गे जाऊन श्रींच्या मंदिरात सोहळ्याची सांगता झाली. दुपारी साडेबारा वाजता संस्थेचे अध्यक्ष राजेश कमानकर सदस्य संजय सोनवणे यांच्या हस्ते अनुक्रमे गजानन महाराज तसेच गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी फक्त मुली असणाऱ्या सुनील डावरे, विजय हिंगे, प्रविण कमानकर, राजमोहन ओझा, भास्कर कोठूरकर, सुशीलकुमार सांगळे, अरुण उगले, ऋषीकेश भसे आदी पालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गणेश मुरकुटे, अंबादास उगले यांनी सूत्रसंचालन तर दिनकर केदारे यांनी आभार मानले.