शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बांगलादेशी मुलीचा सौदा करणा-या सिन्नरच्या ‘नानी’सह दोघांना सात दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:57 IST

वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणा-या कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला दहा महिन्यांपुर्वी विकल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पिडित मुलीने सांगितलेल्या आपबितीनंतर पुढे आल्याने अवघे राज्य हादरले होते.

ठळक मुद्दे पिडित मुलीला देहविक्रयच्या नरकारत ढकलणारी तिची मावशी अद्याप फरार

नाशिक : बांग्लादेशी मुलीची देहविक्रयसाठी खरेदी करणा-या सिन्नरच्या मुसळगाच्या ‘त्या’ कुंटणखान्याची मालकीण संशयित नानी उर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पिडितेवर बलात्कार करणारा नानीचा नराधम मुलगा संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख या तीघा संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पिडित मुलीला देहविक्रयच्या नरकारत ढकलणारी तिची मावशी व काही दलाल अद्याप फरार असून ग्रामिण पोलीस करीत आहेत.वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणा-या कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला दहा महिन्यांपुर्वी विकल्याची धक्कादायक माहिती बुधवारी पिडित मुलीने सांगितलेल्या आपबितीनंतर पुढे आल्याने अवघे राज्य हादरले होते. पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखाण्यासाठी केला आणि काही महिने मुंबईला पिडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तीला कोलकात्याच्या ‘त्या’ बाजारात देहविक्र यासाठी विकले गेले, असा तीचा संपूर्ण प्रवासातील नरकयातना पिडित मुलीने बुधवारी नाशिकमध्ये येऊन माध्यमांसमोर मांडल्या. यानंतर ग्रामिण पोलीस दलासह अवघ्या राज्याला हादरा बसला. पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी याबाबत दखल घेऊन तत्काल उपअधिक्षक विशाल गायकवाड यांना त्वरित तपासचक्रे फिरवून संशयित आरोपींना अटक करण्याचे फर्मान बजावले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक करपे यांच्या पथकाने सिन्नर येथे जाऊन संशयित नानीचा मुलगा व दलाला बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले व नानीच्या गुरूवारी मुसक्या आवळल्या. या सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सिन्नर औद्योगिक वसाहत पोलीसांची भूमिका संशयास्पद असल्याचे पिडित मुलीने दिलेल्या जबाबावरून पुढे आले आहे. सिन्नर पोलिसांनी दहा महिन्यांपुर्वी दखल घेऊन बांग्लादेशी मुलीची खरेदी करणारी ‘नानी’ला खाकीचा हिसका दाखविला असता तर कदाचित ती मुलगी मुंबई येथून पोलिसांना मिळाली असती व तीचा कोलकात्याचा ‘सौदा’ टळला असता अशी चर्चा सुरू आहे. एकूणच या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले असून पिडित मुलगी बांगलादेशला तिच्या कुटुंबापर्यंत कधी पोहचणार याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाNashikनाशिकCourtन्यायालयArrestअटक