पर्यावरण दिनानिमित्त सिन्नरला वृक्षारोपण
By Admin | Updated: June 7, 2014 00:31 IST2014-06-07T00:26:10+5:302014-06-07T00:31:15+5:30
सिन्नर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील तहसील कार्यालय, गोंदेश्वर मंदिर व काही शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण दिनानिमित्त सिन्नरला वृक्षारोपण
सिन्नर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील तहसील कार्यालय, गोंदेश्वर मंदिर व काही शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
वडांगळी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अंजली राजपूत व संस्थेचे अध्यक्ष राहुल सैद यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याचबरोबरच गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण व संवर्धनासाठी संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात आली. येथील श्री एज्युकेशन सोसायटी संचलित श्री माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला. लताताई बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात
आले. (वार्ताहर)