सिन्नरला लोकनाट्यात ‘तमाशा’

By Admin | Updated: February 3, 2016 21:52 IST2016-02-03T21:52:18+5:302016-02-03T21:52:55+5:30

कारवाई : शांतता भंग करणाऱ्या युवकास अटक

Sinnar in 'Tamasha' in Loknata | सिन्नरला लोकनाट्यात ‘तमाशा’

सिन्नरला लोकनाट्यात ‘तमाशा’

सिन्नर : लोकनाट्य तमाशामध्ये मद्य पिऊन गोंधळ घालणाऱ्या युवकाच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
तालुक्यातील निमगाव-सिन्नर येथे सोमवारी रात्री मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा होता. सदर तमाशा पाहण्यासाठी परिसरातील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री तमाशा रंगात आल्यानंतर जमावातून शिट्टा, वन्स मोअर सुरू झाले. यातच बारागावपिंप्री येथील केशव सोपान पानसरे (३०) या युवकाने तमाशात गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी पानसरे यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तमाशा सुरू होताच पानसरे गोंधळ घालत होता.
यावेळी बंदोबस्तावर असलेले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार टी. एस. चौधरी, किशोर सानप, बालाजी सोमवंशी यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची दोडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी पानसरे याच्याविरोधात दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पानसरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Sinnar in 'Tamasha' in Loknata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.