सिन्नरला तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 17:59 IST2019-03-13T17:59:05+5:302019-03-13T17:59:19+5:30
सिन्नर : येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठाण आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा रविवार (दि.१०) रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

सिन्नरला तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा उत्साहात
सिन्नर : येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठाण आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा रविवार (दि.१०) रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
यावेळी गुरूवर्य शंकरराव वैरागकर, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, नगरसेवक सोमनाथ पावसे, ज्योती वामने, सिल्व्हर लोट्स स्कूलचे अध्यक्ष दिलीप बिन्नर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सतीष नेहे, अनिल पवार, अॅड. अविष्कार गंगावणे, अण्णासाहेब थोरमिसे, नारायण वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धेकांना बक्षिस वितरण करून गौरविण्यात आले. सागर कुलकर्णी व हितेश पाटील यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत अभंग, गौळण, भावगीत, भक्तीगीत व चित्रपट गीते, हार्मोनियम आदींचे सादरीकरण करण्यात आले. पंडित वैरागकर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्यांना ११०१ रूपये ते २५१ रूपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती.