जलयुक्तसाठी सिन्नर मॉडेल ठरेल एकनाथ डवले : कोनांबे धरणातून गाळ उपसण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:08 IST2018-03-11T00:08:43+5:302018-03-11T00:08:43+5:30
सिन्नर : जलयुक्तच्या कामाचा चांगला प्रभाव सिन्नर तालुक्यात दिसू लागला असून, पूर्वी तालुक्यात दुष्काळी स्थिती होती. यंदाही दीड मीटरने पाणी पातळी वाढली असल्याने ही समाधानाची बाब आहे.

जलयुक्तसाठी सिन्नर मॉडेल ठरेल एकनाथ डवले : कोनांबे धरणातून गाळ उपसण्यास प्रारंभ
सिन्नर : जलयुक्तच्या कामाचा चांगला प्रभाव सिन्नर तालुक्यात दिसू लागला असून, पूर्वी तालुक्यात दुष्काळी स्थिती होती. यंदाही दीड मीटरने पाणी पातळी वाढली असल्याने ही समाधानाची बाब आहे. पूर्वी उन्हाळ्यात दररोज ४० ते ५० टँकर लागणाºया तालुक्यात जलयुक्तच्या कामांमुळे स्थिती बदलू लागली आहे. जलयुक्तसाठी भविष्यात सिन्नर तालुका राज्याचे मॉडेल असेल, असा विश्वास जलसंवर्धन व रोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केला. शासन, टाटा ट्रस्ट व युवा मित्रच्या जलसमृद्धी कार्यक्रमास लोणारवाडी येथे युवामित्र संस्थेच्या प्रांगणात टाटा ट्रस्टच्या पोकलेनचे हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर कोनांबे येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन धरणातील गाळ उपसण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. लोणारवाडी येथे युवामित्र संस्थेच्या प्रांगणात पोकलेन हस्तांतरण कार्यक्रमात डवले बोलत होते. व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, उदय सांगळे, टाटा ट्रस्टचे कुमार चैतन्य, नितीन आहेर, अधीक्षक अभियंता सागर शिंदे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता एस.एस. गोंदकर, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, उपसभापती वेणू डावरे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, नगरसेवक विजय जाधव, रूपेश मुठे, गोविंद लोखंडे आदी उपस्थित होते.