सिन्नरला २५ मुख्याध्यापक आदर्श पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:39+5:302021-09-06T04:18:39+5:30

शिक्षक दिनानिमित्त सिन्नरच्या नवजीवन डे स्कूलमध्ये आयडीबीआय सिन्नर शाखेचे व्यवस्थापक अमरकुमार व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. ...

Sinnar honored with 25 Headmaster Adarsh Awards | सिन्नरला २५ मुख्याध्यापक आदर्श पुरस्काराने सन्मानित

सिन्नरला २५ मुख्याध्यापक आदर्श पुरस्काराने सन्मानित

शिक्षक दिनानिमित्त सिन्नरच्या नवजीवन डे स्कूलमध्ये आयडीबीआय सिन्नर शाखेचे व्यवस्थापक अमरकुमार व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्या हस्ते सदर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी आयडीबीआय सिन्नर शाखा व सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने तालुक्यातील २५ मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला.

आयडीबीआय बँक सतत शिक्षकांच्या पगारासाठी तत्पर असते. तालुक्यात आयडीबीआय बँकेने शिक्षकांसाठी गृहकर्ज, गोल्ड लोन, लॉकर्स यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सातत्याने मुख्याध्यापक व आयडीबीआय बँक यांचा समन्वय असतो. या समन्वयाच्या माध्यमातून तालुक्यातील कर्तृत्ववान मुख्याध्यापकांचा सन्मान केल्याचे व्यवस्थापक अमरकुमार यांनी सांगितले.

सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आयडीबीआय बँकेचे शाखा अधिकारी अमर कुमार, उपशाखा अधिकारी संदीप चौगुले, कॅशियर श्रीकांत देशपांडे, अंजली वाघ, बच्छाव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख, कार्याध्यक्ष आर. बी. एरंडे, कार्यवाहक बी. व्ही. पांड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सत्कारार्थी मुख्याध्यापक

आर. बी. एरंडे (एस. जी पब्लिक स्कूल सिन्नर), आर. एम. लोंढे (महात्मा फुले विद्यालय, सिन्नर), रेखा हिरे(चांडक कन्या विद्यालय, सिन्नर), बाळासाहेब हांडे(ब. ना. सारडा विद्यालय, सिन्नर), एस. जी. सोनवणे (ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल दोडी), किशोर जाधव (जनता विद्यालय डुबेर), एम. के. वाघ (माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवाडे), आर. एल. चिने (पाथरे हायस्कूल, पाथरे), बी. बी. पाटील (नवजीवन डे, स्कूल सिन्नर), बी. आर. कहांडळ (लोकनेते शं. बा. वाजे विद्यालय सिन्नर), एस. एस. जगदाळे (भिकुसा विद्यालय, सिन्नर), श्रीमती हांडगे (जनता विद्यालय मनेगाव), एस. बी. जाधव (देवपूर हायस्कूल, देवपूर), शांताबाई विश्वनाथ शिरोळे (पंचाळे हायस्कूल, पंचाळ), मिलिंद खैरनार (माध्यमिक आश्रम शाळा, रामनगर), प्रतिभा शिंदे (जनता विद्यालय, गोंदे), एम. डी. काळे (एस. एस. विद्यालय गुळवंच), दिलीप रानडे (डी. एम. हायस्कूल मऱ्हळ), बी. व्ही. पांडे (माध्यमिक विद्यालय, विंचूर दळवी), एस. एन. सांगळे (माध्यमिक विद्यालय पास्ते), एस. बी. देशमुख (पाताळेश्वर विद्यालय पाडळी), ऋषाली लोंढे (नवजीवन डे स्कूल, सिन्नर), अनिता कांडेकर(एस. जी. पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम, सिन्नर).

(०५ सिन्नर)

सिन्नर येथील नवजीवन डे स्कूलमध्ये आयडीबीआय बॅँक सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने २५ मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितीत तालुक्यातील मुख्याध्यापक व बॅँकेचे अधिकारी.

050921\05nsk_28_05092021_13.jpg

सिन्नर येथील नवजीवन डे स्कूल मध्ये आयडीबीआय बॅँक सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने २५ मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितीत तालुक्यातील मुख्याध्यापक व बॅँकेचे अधिकारी. 

Web Title: Sinnar honored with 25 Headmaster Adarsh Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.