नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:11 IST2019-01-16T13:11:08+5:302019-01-16T13:11:17+5:30
सिन्नर : न्यायालयाचा आदेश झुगारून बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या शहरातील दुकानदाराविरोधात सिन्नर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे

नायलॉन मांजा विक्रीप्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल
सिन्नर : न्यायालयाचा आदेश झुगारून बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या शहरातील दुकानदाराविरोधात सिन्नर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (दि.१५) रोजी सिन्नर शहरात पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. कानडी मळा परिसरातील संजय गोरक्षनाथ कुमावत यांच्या दुकानातून नायलॉन मांजा जप्त करत त्याच्या विरोधात सिन्नर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला. महिनाभरात सिन्नर शहरात नायलॉन मांजामुळे दोन ते तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी शहरातील पतंग उडविणारांची चौकशी करून त्यांच्याकडील नायलॉनमांजा जप्त करत यापुढे मांजा न वापरण्याची त्यांना ताकीद दिली.