शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला बालेकिल्ल्यानेच वाजेंसाठी रचला इतिहास

By admin | Updated: October 21, 2014 01:56 IST

सिन्नरला बालेकिल्ल्यानेच वाजेंसाठी रचला इतिहास

 

सिन्नर : दुरंगी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी भाजपाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यावर एकतर्फी विजय मिळविला; त्यात सिन्नर शहरासह पश्चिम पट्ट्यातील मतदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोकाटे यांच्या पूर्वभागातील बालेकिल्ल्यात फूटतूट झाल्याचे दिसून आले, तर पश्चिम पट्ट्यातील वाजे यांचा बालेकिल्ला गेल्या निवडणुकीपेक्षाही अधिक भरभक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला. पश्चिम पट्ट्याने वाजे यांना भरघोस मताधिक्य देऊन विजयाचा इतिहास रचल्याचे आकडेवारीहून दिसून येते.माणिकराव कोकाटे पूर्वभागातील असल्याने गेल्या पंधरा वर्षांपासून हा भाग कोकाटे यांची भरभक्कम पाठराखण करीत होता. मात्र, या निवडणुकीत कोकाटे यांच्या पाठीशी पूर्वभाग पूर्ण ताकदीनिशी नसल्याचे दिसून आले. गेल्या निवडणुकीत कोकाटे यांना पूर्वभागातून मिळालेली आघाडी पश्चिम पट्ट्याला मोडणे शक्य झाले नव्हते. मात्र, या निवडणुकीत पश्चिम पट्ट्याने पूर्वभागातील कोकाटे यांचे अल्पसे मताधिक्य मोडून वाजे यांना भरभक्कम आघाडी दिली. टाकेद गटानेही गेल्या निवडणुकीत कोकाटे यांना साथ दिली होती. यावेळी टाकेद गट वाजे यांच्या पाठीशी राहिला. या निवडणुकीत कोकाटे यांना पूर्वभागातून म्हणावी तेवढी आघाडी राखता आली नाही. याउलट वाजे यांच्या पाठीशी पश्चिम पट्टा पूर्ण क्षमतेने मैदानात उतरल्याचे दिसून आले. टाकेद गटानेही यावेळी कोकाटे यांना साफ नाकारून वाजे यांना सुमारे साडेचार हजाराचे मताधिक्य बहाल केले. चास गटाने तर वाजे यांना तर तब्बल दहा हजारांहून अधिक मतांचे दान झोळीत टाकले.कोकाटे यांना पूर्वभागातील देवपूर जिल्हा परिषद गटातून सात हजार ७८४ मताधिक्य मिळाले तर नांदूरशिंगोटे गटात ९८८ मतांची आघाडी राहिली. वाजे यांना सिन्नर शहरासह नायगाव, मुसळगाव, ठाणगाव, चास व टाकेद या जिल्हा परिषद गटात भरघोस मताधिक्य मिळाले. त्यामुळे वाजे यांचा विजय सुकर झाला. गेल्या निवडणुकीपेक्षा वाजे यांचे सिन्नर शहरातील मताधिक्य कमी झाले. वाजे यांच्या डुबेरे या गणाने तब्बल सात हजार २२३ मतांची भरभक्कम आघाडी देऊन वाजे यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पोस्टल मतदानातही वाजे यांनी बाजी मारली. पोस्टल मतदानाचे वाजे यांना ३१५, तर कोकाटे यांना १८७ मते मिळाली. निवडणुकीत ८९९ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. (वार्ताहर)