सिन्नरला सहा बंधाऱ्यांतून गाळ उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:24 IST2019-04-04T23:21:01+5:302019-04-04T23:24:09+5:30
सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नरच्या सोनर ओहोळ व बलक वस्ती परिसरातील सहा बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे या बंधाºयाच्या जलक्षमतेत सुमारे १ कोटी २० लाख लिटरने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सिन्नर तालुक्यातील वडगाव-सिन्नर शिवारात बंधाऱ्यामधून गाळ उपसा करण्यास प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी राजेंद्र चव्हाणके, शंकर पगार, राजाराम खताळे यांच्यासह शेतकरी.
सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नरच्या सोनर ओहोळ व बलक वस्ती परिसरातील सहा बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे या बंधाºयाच्या जलक्षमतेत सुमारे १ कोटी २० लाख लिटरने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कृषी विभागामार्फत गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत या बंधाºयामध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ उकरण्यात आला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात शेतकºयांनी स्वखर्चाने गाळ आपापल्या शेतात टाकून घेतला. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र सुपीक झाले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणात सिंचनाचा फायदा होणार असल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गाळ उपसा करण्यासाठी मशीन व डिझेलचा खर्च कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला. सोनर ओहोळ भागातील चार तर बलकवस्ती परिसरातील दोन बांधºयांतून गाळ उपसा करण्यात आला आहे. एका नाल्याचे खोलीकरणदेखील करण्यात आल्याने पावसाळ्यात या भागातून वाहून जाणारे पाणी अडविले जाणार आहे. गाळ उपसा करण्यासाठी हायवा मालक देवा आवारे, अक्षय उगले, सुभाष गांडोळे, शरद काकड आदींनी सहकार्य केले व हायवाच्या माध्यमाने गाळ उपसा करण्यात आला. राजेंद्र चव्हाणके यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या कामात शंकर पगार, राजाराम खताळे यांचेही सहकार्य लाभल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रत्येक बंधाºयाची क्षमता अंदाजे २० लाख लिटरने वाढली आहे. परिसरातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्यामुळे बंधाºयातील गाळ उपसा करण्याचे काम मार्गी लागले आहे. शेतकºयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गाळ उपसा करून शेतात टाकून जमीन सुपीक केली आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
- राजेंद्र चव्हाणके, शेतकरी