सिन्नरला प्रशासनाचा जनजागृतीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:46 IST2020-04-08T23:45:53+5:302020-04-08T23:46:54+5:30
कोरोनाचे संकट गंभीर झाले असतानाही सर्वसामान्य त्याबाबत गंभीर नसल्याने प्रशासनाला जनजागृतीवर भर द्यावा लागत आहेत. नगर परिषदेच्या समोर चित्रकार परिश जुमनाके यांनी चितारलेले भव्य असे संदेश देणारे चित्र शहरात सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

सिन्नर येथे नगर परिषदेसमोर चित्रकार परिश जुमनाके यांनी चितारलेले जनजागृतीचा संदेश देणारे चित्र.
सिन्नर : कोरोनाचे संकट गंभीर झाले असतानाही सर्वसामान्य त्याबाबत गंभीर नसल्याने प्रशासनाला जनजागृतीवर भर द्यावा लागत आहेत. नगर परिषदेच्या समोर चित्रकार परिश जुमनाके यांनी चितारलेले भव्य असे संदेश देणारे चित्र शहरात सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
नगर परिषदेच्या वतीने जनजागृतीसाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. त्यात आज चित्रकारही सरसावले आहेत. आपण सर्वांनी मनावर घेतलं तर ‘कोरोना’ हारेल आणि आपल्यासह देश जिंंकेल असा संदेश देणाऱ्या या चित्राने सर्वसामान्यांना ‘कोरोना’बाबतीत जागे करण्याचे काम केले आहे. मीच माझी काळजी घेणे गरजेचे असून ‘मीच माझा रक्षक’ असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. असेच भव्य दिव्य चित्र छत्रपती शिवाजी चौकात साकारण्यात आले असून सोशल मीडियावरही त्याचे कौतुक होत आहे. नगराध्यक्ष किरण डगळे, पाणीपुरवठा सभापती शैलेश नाईक, शुभम घुगे, कांचेश पवार, निखिल उगले यांनी नगर परिषदेसमोर साकारण्यात आलेल्या कलाकृतीची पाहणी करून परिशचे कौतुक केले.