सिन्नरला कॉँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 18:57 IST2020-12-28T18:56:47+5:302020-12-28T18:57:19+5:30
सिन्नर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सोमवारी (दि.२८) काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला.

सिन्नर येथे कॉँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी विनायक सांगळे, दिनेश चोथवे, मुजाहिब खतीब, भाऊसाहेब शेळके, वामनराव खाडे, जाकीर शेख, उदय जाधव आदी.
सिन्नर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने सोमवारी (दि.२८) काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला.
कॉंग्रेस पक्षाची स्थापना २८ डिसेंबर १८८५ झालीअसून आज पक्षाला १३६ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यात या काँग्रेस पक्षाचे योगदान विसरण्यासारखे नसल्याचे सिन्नरचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी वामनराव खाडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुजाहिद खतीब व जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, तालुका समन्वयक उदय जाधव, तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जाकीर शेख, अश्फाक शेख, ज्ञानेश्वर पवार, अंबादास भालेराव, वामनराव काळे, चंद्रकांत डावरे, त्र्यंबकराव सोनवणे मधुकर कपूर, सागर जाधव आदी उपस्थित होते.