शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सिन्नर नागरी पतसंस्था फसवणुकीतील प्रमुख संशयित सूरज शहाला गुजरातहून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 1:23 AM

सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेटे गल्ली, सिन्नर) यास गुजरात व दीवदमन राज्याच्या सीमावर्ती भागातील जैन धर्मशाळेतून स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि़२३) अटक केली़ २९ आॅगस्ट २०१७ पासून संशयित शहा हा पोलिसांना चकवा देत होता़

नाशिक : सिन्नर तालुक्यातील सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित तथा महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेला सूरज प्रकाश शहा (४७, रा़शेटे गल्ली, सिन्नर) यास गुजरात व दीवदमन राज्याच्या सीमावर्ती भागातील जैन धर्मशाळेतून स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि़२३) अटक केली़ २९ आॅगस्ट २०१७ पासून संशयित शहा हा पोलिसांना चकवा देत होता़ सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१४ ते २०१६ लेखापरीक्षण अहवालात संस्थेचे चेअरमन, संचालक, सरव्यवस्थापक व कार्यकारिणीने संगनमत करून संस्थेतील विनातारण कर्ज प्रकरणे, कर्ज बोजा नोंद न केलेल्या मिळकती, कर्ज असताना देण्यात आलेले नील दाखले, संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर केलेले कर्जवाटप तसेच खोटे दस्तऐवज तयार करून संस्थेची व ठेवीदारांची ४३ कोटी ४८ लाख ४१ हजार ८२२ रुपयांची फसवणूक केली़ याप्रकरणी सनदी लेखापाल अजय राठी यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात २९ आॅगस्ट २०१७ रोजी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़  सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्णाचा तपास ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता़, तर संचालक मंडळातील १३ संशयितांना यापूर्वीच अटक करण्यात आली असली तरी पतसंस्थेचा अध्यक्ष व संशयित सूरज शहा हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता़ स्थानिक गुन्हे शाखेने शहा याचे नातवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून माहिती मिळवून गिरसोमनाथ जिल्ह्णातून अटक केली़  ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, पोलीस नाईक प्रीतम लोखंडे, पोलीस शिपाई रवींद्र टर्ले, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, खांडेकर यांनी ही कामगिरी केली़आठ दिवसांपासून पथक गुजरातमध्येसंशयित सूरज शहा यांच्या शोधासाठी गेलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आठ दिवसांपासून गुजरात राज्यात शोध घेत होते़ गुजरातमधील विविध शहरे, धार्मिक स्थळे, सुमारे २५० लॉज तसेच धर्मशाळांची या पथकाने तपासणी केली़ विशेष म्हणजे फरार झाल्यानंतर गुजरात, राजस्थान, दीव-दमण राज्यात शहा फिरत होता़ नाशिकपासून सुमारे एक हजार तीनशे किलोमीटरवरील जैन धर्मशाळेत लपून बसलेल्या शहा यास ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे़ एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर चेअरमन तथा प्रमुख संशयित सूरज शहा हा फरार झाला होता़ त्याच्या शोधासाठी सीमेलगतचे जिल्हे तसेच परराज्यांतही पथके पाठविण्यात आली होती, मात्र तो हाती आला नव्हता़ यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांच्या पथकाने तपास करून गुजरात राज्यातील गिरसोमनाथ जिल्ह्णाच्या उणा तालुक्यातील अंजार येथील एका जैन धर्मशाळेतून त्यास ताब्यात घेतले़ - संजय दराडे,  अधीक्षक, नाशिक ग्रामीण

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा