Single Tulsi marriage in single house | एकलहरेत तुलसी विवाह संपन्न
एकलहरेत तुलसी विवाह संपन्न

एकलहरे : येथून जवळच असलेल्या एकलहरेरोडवरील मगर मळ्यात तुलसी विवाह थाटामाटात संपन्न झाला. येथील ज्येष्ठ नागरिक धनाजी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीत प्रथा-परंपरांना उजाळा देत परिसरातील रहिवासींनी तुळशीची सजावट करून, दागदागिने व साजशृंगार करून व राधाकृष्ण मूर्तींची सजावट करून तुलसी विवाह थाटात साजरा केला.तुलसी विवाहानंतर भारतीय संस्कृ ती, परंपरांना अनुसरून विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी धनाजी गुरव, गणेश मगर, वाल्मीक शेळके, तानाजी मगर, मधुकर मगर, शिवाजी मगर, धनाजी मगर, मधुकर कड, रामदास कवडे, रोशन मगर, रोहित मगर, वैभव मगर, ओमकार मगर, सोमनाथ मगर, संदीप भोर, ज्ञानेश्वर भोर यांच्यासह परिसरातील महिला व भाविक उपस्थित होते.

Web Title:  Single Tulsi marriage in single house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.