शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

एमसीएसाठी राज्यभरात एकच सीईटी, 24 मार्चला परीक्षा : डॉ. श्रीराम झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:59 IST

 मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (एमसीए) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून राज्य शासनातर्फे येत्या २४ मार्च रोजी एमसीएसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून सोमवार दि. ५ मार्चपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी असेल अशी माहिती मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ एमसीए इंस्टिट्यूटचे (एम ए एम आय ) सदस्य तथा डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीराम झाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देएमसीएसाठी २४ मार्चला सीईटीऑनलाईन अर्ज कऱण्यासाठी ५ मार्चपर्यंत संधीएमसीए अभ्यासक्रमासाठी सीईटी अनिवार्य

नाशिक : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (एमसीए) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून राज्य शासनातर्फे येत्या २४ मार्च रोजी एमसीएसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून सोमवार दि. ५ मार्चपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी असेल अशी माहिती मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ एमसीए इंस्टिट्यूटचे (एम ए एम आय ) सदस्य तथा डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीराम झाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परीक्षेचे प्रवेश अर्ज भरण्यापासून ते सराव परीक्षेपर्यंतचे सर्व मार्गदर्शन व मदत करण्यासाठी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये सुविधा केंद्र सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.इंजिनिअरिंग, फार्मसी यांसह सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य शासनातर्फे सीईटी परीक्षा घेतल्या जातात. एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असते. सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. ५ मार्चपर्यंत विहित मुदतीत अर्ज करून प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. बहुपर्यायी स्वरुपात होणाऱ्या या परीक्षेसाठी २०० गुण असतील. निगेटिव्ह मार्किंग असल्याने विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक प्रश्नांची उत्तरे लिहावीत. ऑनलाइन स्वरुपात ही परीक्षा होणार असून त्यासाठी ९० मिनिटांचा वेळ असेल. विद्यार्थ्यांना १५ ते २४ मार्च रोजी हॉल तिकीट उपलब्ध होतील. २४ मार्च रोजी परीक्षा होईल. तर ३ एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल. या प्रवेश परीक्षेविषयी मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इन्स्टिट्यूटचे समन्वयक महेश कुलकर्णी, विभागप्रमुख प्रा. अपर्णा हवालदार, प्रा. नितीन चौधरी, प्रा. संजय साळवे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. सतेज चिटकुले, प्रा.वैशाली निकम आदी उपस्थित होते.एमसीएच्या राज्यात सात हजार जागाएमसीए अभ्यासक्रमाच्या राज्यभरातील विविध महाविद्यालयांत ७ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मागील वर्षी १२ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. त्यातील तब्बल ५० टक्क्यांहून अधिक जागा म्हणजेच ३७०० जागा रिक्त राहिल्या होत्या. सीईटी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा न दिल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुुळे यंदा विद्यार्थ्यांना सीईटी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीexamपरीक्षा