शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मातृभूमीत परतल्याची भावनिक पोस्ट; अवघ्या काही तासांत गायिकेचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 20:56 IST

शहापूरजवळ गाडीला अपघात; पतीवर उपचार सुरू

नाशिक: प्रसिद्ध गायिका गीता माळी यांच्या गाडीला शहापूरजवळ अपघात झाला. त्यामध्ये त्यांचं निधन झालं. तर त्यांचे पती विजय माळी जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे अपघाताच्या काही तासांपूर्वीच गीता माळी अमेरिकेतून मुंबईत दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला होता. मात्र मुंबईहून नाशिककडे जात असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. मुंबईहून नाशिककडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात गीता माळी यांचा मृत्यू झाला. गीता माळी गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेत होत्या. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर काही फोटो पोस्ट केले. 'मायदेशी दाखल. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है. बऱ्याच कालावधीनंतर घरी आल्यानंतर अतिशय आनंदी आहे,' अशी पोस्ट लिहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील फोटो शेअर केले होते. मुंबईत दाखल झाल्यानंतर गीता माळी पती विजय माळींसोबत नाशिकला कारने येत होत्या. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची कार ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक आली असताना श्वानाला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन  धडकली. या घटनेत माळी यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांचे पती विजय अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानं कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  माळी यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत माळी यांच्या आठवणी शेअर केल्या आहे.

टॅग्स :Accidentअपघात