विडी कामगारांचा सिन्नरला शनिवारी मोर्चा
By Admin | Updated: March 16, 2016 22:29 IST2016-03-16T22:23:29+5:302016-03-16T22:29:54+5:30
विडी कामगारांचा सिन्नरला शनिवारी मोर्चा

विडी कामगारांचा सिन्नरला शनिवारी मोर्चा
ंसिन्नर : केंद्र सरकारने विडी बंडलवर
८५ टक्के धोका असणारे चित्र छापण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ विडी कामगार संघटनेने शनिवारी (दि. १९) तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती नारायण आडणे यांनी दिली.
या निर्णयाच्या निषेधार्थ व विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता कामगार चौकातील सिन्नर तालुका विडी कामगार संघाच्या कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ होणार आहे. शनिवार हा दिवस अखिल भारतीय विडी सिगार अॅण्ड टोमॅको फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय आंदोलन दिन पाळला जाणार आहे.
सिन्नर येथे शनिवारी मोर्चाप्रसंगी आयटकचे राज्य सचिव राजू देसले, विडी कामगार फेडरेशनचे अध्यक्ष कारभारी उगले मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विडी कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आडणे यांच्यासह म्हाळू पवार, दामू मुंडे, बालाजी साळी, नामदेव आंबेकर, विठ्ठल पाटील, विठ्ठल लोणारे,
भाऊशेठ झगडे, हरी मुत्रक,
शांताराम रेवगडे, सुकदेव पाटोळे,
पंढरी काळुंगे, रेणुका वंजारी,
इंदूबाई जाधव, चंद्रभागा पद्मसाळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले
आहे. (वार्ताहर)