आहुर्ली : इगतपुरी तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या सांजेगाव-नांदडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सिंधूबाई काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणुकीच्या निमित्ताने बोलविलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच नीता गोवर्धने होत्या.विद्यमान उपसरपंच मच्छिंद्र गोवर्धने यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्याकरिता विशेष बैठक घेण्यात आली.यावेळी उपसरपंचपदासाठी सिंधूबाई काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक के. जे. कुलकर्णी यांनी काम पाहिले.निवडीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खातळे, मंगेश शिंदे, मच्छिंद्र गोवर्धने, इंदूबाई गोवर्धने, मुक्ता गोवर्धने, मनीषा गोवर्धने, सीताबाई गोवर्धने, माजी चेअरमन केरू पा.गोवर्धने, खंडू गोवर्धने, बाळू गोवर्धने, नंदू गोवर्धने, शंकर गोवर्धने, पंडित काळे, नाना गोवर्धने, त्र्यंबक काळे, काशीनाथ गोवर्धने, योगेश काळे आदी उपस्थित होते.
सांजेगाव-नांदडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सिंधूबाई काळे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 23:00 IST
आहुर्ली : इगतपुरी तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या सांजेगाव-नांदडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सिंधूबाई काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सांजेगाव-नांदडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सिंधूबाई काळे बिनविरोध
ठळक मुद्देउपसरपंचपदासाठी सिंधूबाई काळे यांचा एकमेव अर्ज