सरसकट कर्जमाफी द्या
By Admin | Updated: July 9, 2017 23:53 IST2017-07-09T23:34:22+5:302017-07-09T23:53:17+5:30
चांदवड : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

सरसकट कर्जमाफी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना सरसरकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने चांदवडचे तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड, उपसभापती अमोल भालेराव, शैलेश ठाकरे, शहाजी भोकनळ, विजय जाधव, तुकाराम सोनवणे, प्रकाश शेळके, अनिल पाटील, अनिल काळे, रिजवान घासी, महेश देशमाने, वैभव ठाकरे, भाऊसाहेब शेलार, म्हसू गागरे, मतीन घासी, अनिल पवार, सुनील ठाकरे, संतोष ठाकरे, पंढरीनाथ पगार, नरेंद्र ठाकरे, प्रकाश ठाकरे, बापू शिंदे, सुभाष जाधव आदींसह असंख्य राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना ठरावीक शेतकऱ्यांनाच याचा लाभ होणार आहे. त्यामुळे सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.