साधेपणाने लग्नामुळे कोट्यवधींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:46 PM2020-05-30T22:46:45+5:302020-05-30T23:56:16+5:30

अख्ख्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र याच कोरोनामुळे वायफळ खर्च होणाºया कोट्यवधी रुपयांची बचत होत असल्याचे सुखद चित्र सध्या होत साध्या पद्धतीच्या विवाह सोहळ्यांवरून दिसत आहे. अवघ्या हजारो रुपयांमध्ये यंदा कर्तव्य पार पडत आहे.

Simply getting married saves billions | साधेपणाने लग्नामुळे कोट्यवधींची बचत

साधेपणाने लग्नामुळे कोट्यवधींची बचत

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या भीती । आर्थिक घडी विस्कटल्याचा परिणाम

दत्ता दिघोळे ।
नायगाव : अख्ख्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र याच कोरोनामुळे वायफळ खर्च होणाºया कोट्यवधी रुपयांची बचत होत असल्याचे सुखद चित्र सध्या होत साध्या पद्धतीच्या विवाह सोहळ्यांवरून दिसत आहे. अवघ्या हजारो रुपयांमध्ये यंदा कर्तव्य पार पडत आहे.
जीवघेण्या विषाणूने संपूर्ण जगात आपले हातपाय पसरले आहे. कोरोनाच्या कहराने देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्याने बेरोजगारीची भीती निर्माण केली आहे. ग्रामीण भागावरही कोरोनाने आपली दहशत जमवली आहे. असे असले तरी या कोविड-१९च्या भीतीपोटी व सुरक्षेच्या कारणांमुळे खेड्यातील लाखो रुपयांची बचत झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
कोरोनाचा जेव्हापासून शिरकाव वाढला तेव्हापासून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र याच कोरोनामुळे गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच काटकसरीने जीवन जगण्यास भाग पाडले आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने लादल्यामुळे वर्षभरात जमलेले विवाहही अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत मोजक्या वºहाडींच्या उपस्थितीत परवानगी मिळताच विवाहांना सुरुवात झाली. मात्र मोठ्या बडेजावात होणारे विवाह अतिशय साध्या पद्धतीने आणि तेही अंगणात होऊ लागले.
एकट्या नायगाव खोºयात झालेले शेकडो विवाह केवळ हजारो रुपयांत पार पडले. अशा पद्धतीने झालेल्या लग्न समारंभातून कोट्यवधी रुपयांची बचत झाल्याचे सुखद चित्र यंदा दिसत आहे. कोरोनामुळे का होईना सार्वजनिक कार्यक्र म साध्या पद्धतीने होत आहेत. अशा पद्धतीनेच यापुढेही सर्वच कार्यक्र म कमी नातेवाईक, आप्तेष्टांच्या उपस्थितीत साजरे करण्याची नवीन पद्धत सर्वच समाजाने अंगीकारली तर नक्कीच एक आदर्श निर्माण होऊ शकेल, अशी चर्चा होत आहे.

Web Title: Simply getting married saves billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.