शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

समान बांधकाम नियमावली नाशिकवर पुन्हा अन्याय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:02 AM

राज्य शासनाने मुंबई महापालिका वगळता अन्य सर्व महापालिका आणि नियोजन प्राधीकरणांसाठी एकत्रित सर्व समावेशक बांधकाम नियंत्रण नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे नाशिकची प्रचलित बांधकाम नियंत्रण नियमावली रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रस्तावित नियमावलीतदेखील अनेक बाबतीत नाशिकला वगळून जाचक नियमच लागू ठेवल्याचा आरोप होत आहे.

ठळक मुद्दे सध्याचा डीसीपीआर रद्द होण्याची शक्यता

नाशिक : राज्य शासनाने मुंबई महापालिका वगळता अन्य सर्व महापालिका आणि नियोजन प्राधीकरणांसाठी एकत्रित सर्व समावेशक बांधकाम नियंत्रण नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे नाशिकची प्रचलित बांधकाम नियंत्रण नियमावली रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रस्तावित नियमावलीतदेखील अनेक बाबतीत नाशिकला वगळून जाचक नियमच लागू ठेवल्याचा आरोप होत आहे.राज्य शासनाने बृहन्मुंबई महापालिका वगळता अन्य सर्व महापालिका आणि विकास प्राधीकरणांसाठी एकत्रित नियमावली लागू करण्याची अधिसूचना ८ मार्च रोजी जारी केली असून, त्यात प्रस्तावित नियम मांडले आहेत. त्यावर हरकती आणि सूचनांसाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. राज्य शासनाने नियमावलीत बदल करून ती कायम केल्यास दोन वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेला लागू केलेली बांधकाम नियंत्रण नियमावली रद्द होण्याची शक्यता आहेत अर्र्थात, शासनाच्या प्रारूप नियमावलीबाबत विकासक आणि वास्तुविशारदांकडून संमिश्र मते व्यक्त होत आहेत.अनेक बाबतीत समान नियमावली करताना नाशिकला वगळल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे नाशिककरांवर अन्याय होणार असल्याची भीती ज्येष्ठ वास्तुविशारद अरुण काबरे यांनी व्यक्त केली आहे. अनेक विकासकांनी लवकरच या नियमावलीचा अभ्यास करूनच याबाबत सांगता येईल असे स्पष्ट केले असले तरी समान नियमावली असेल तर भेदाभेद करता कामा नये असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार