सिंहस्थांच्या रस्त्यांची कामे निकृष्ट मनसेचे निवेदन
By Admin | Updated: December 2, 2014 01:01 IST2014-12-02T01:00:51+5:302014-12-02T01:01:46+5:30
सिंहस्थांच्या रस्त्यांची कामे निकृष्ट मनसेचे निवेदन

सिंहस्थांच्या रस्त्यांची कामे निकृष्ट मनसेचे निवेदन
नाशिक : जिल्'ातील सिंहस्थ निधीच्या कामांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या निकृष्ट दर्जाबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात, हे काम निकृष्ट दर्ज्याचे सुरू असून, कामांची तत्काळ चौकशी करून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्'ात सिंहस्थांतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांसाठी केंद्र व राज्य सरकारांच्या माध्यमातून आलेल्या निधीतून सुरू असलेल्या कामांव्यतिरिक्तजिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ६०० कोटींच्या आसपास रकमेची विकासकामे सुरू आहेत. या कामांच्या दर्जाबाबत सर्व सामान्य नागरिक तसेच संबंधित कामांच्या तज्ज्ञांकडून शंका व्यक्त करण्यात आली असून, संबंधित कामांचे ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांच्या संगनमताने अतिशय सुमार दर्जाची कामे सुरू आहे. कुठल्याही विकासकामांसंदर्भात असलेले सर्वमान्य निकष पूर्ण न करता फक्त ठरवून दिलेल्या वेळेत व वरवरच्या टापटीपेसह कामे उरकून जनतेच्या कष्टाच्या पैश्यातून कर रूपाने शासनाकडे वर्ग झालेल्या निधीचा अशाप्रकारे गैरवापर सुरू आहे. त्यामुळे सिंहस्थांच्या या कामांची तज्ज्ञांची समिती गठीत करून या समितीकडून चौकशी करण्यात यावी व जनतेच्या निधीचा गैरवापर रोखावा,असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसेचे प्रताप मेहरोलीया,रमेश खांडबहाले, कैलास चव्हाण, अनिल गायधनी, हरिश्चंद्र बोराडे, संजय पगार, शिवा आगळे, प्रकाश धोेंगडे,भगवान गायधनी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)