नियोजन आयोगापुढे सिंहस्थाचे सादरीकरण
By Admin | Updated: December 23, 2014 00:35 IST2014-12-23T00:34:48+5:302014-12-23T00:35:05+5:30
नियोजन आयोगापुढे सिंहस्थाचे सादरीकरण

नियोजन आयोगापुढे सिंहस्थाचे सादरीकरण
नाशिक : सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने आपला साडेसातशे कोटी रुपयांचा खर्चाचा वाटा उचलून निधी उपलब्ध करून दिलेला असला तरी, अद्याप जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने केंद्र सरकारच्या नियोजन आयोगाकडे सादर केलेला खर्चाचा आराखडा मंजूर होऊन केंद्र सरकारकडून निधी मिळण्याची आशा बळावली आहे. त्या संदर्भात मंगळवारी नियोजन आयोगाने तातडीची बैठक बोलविली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जिल्हा प्रशासनाने केंद्रीय नियोजन आयोगाकडे २३०० कोटी रुपये खर्चाचा आराखडा सादर करून निधीची मागणी केली होती. त्यानंतर वर्षभरानंतर म्हणजेच गेल्या आठवड्यात नव्याने पुन्हा आराखडा सादर करण्यात आला. गेल्या आठवड्यात नागपूर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उच्चाधिकार व शिखर समितीच्या बैठकीत आणखी अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या कामांना शिखर समितीने तत्त्वत: मान्यता दिली आहे. कुंभमेळ्यासाठी करावयाची कामे व त्यासाठी येणारा खर्च याबाबत संभ्रम असून, नाशिक महापालिकेने यापूर्वीच कामे करण्यासाठी निधी नसल्याने असमर्थता व्यक्त करून राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे.