लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी नाशिकत्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा ठरल्या. पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ला, दूसरे ३१ ऑगस्ट २०२७ नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे एकाच दिवशी, तर नाशकातील पर्वणीचे तृतीय अमृतस्नान ११ सप्टेंबर २०२७ रोजी, त्र्यंबकेश्वर पर्वणीतील तृतीय अमृतस्नान १२ सप्टेंबर २०२७ ला होणार आहे.
ध्वजारोहणालाच प्रारंभ
नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची अमृतस्नान पर्वणीच्या तारखा निश्चितीसाठीची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर २०२६ या दिवशी होणार असल्याने त्या दिवसापासून सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. त्रिखंडी कुंभमेळा २२ महिने चालणार नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळा १३ महिन्यांचा असतो. मात्र, यंदा हा त्रिखंडी कुंभमेळा असल्याने २२ महिने चालणार आहे. असा योग नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये ७१ वर्षांनी येणार आहे.
कुंभ पर्वकाल समाप्ती कधी ?
- नाशिकला आखाड्याचे ध्वजारोहण : २४ जुलै २०२७
- ध्वज अवतरणसह कुंभपर्वकाल समाप्ती : २४ जुलै २०२८
- दोन्ही ठिकाणच्या तीन पर्वण्यांव्यतिरिक्त नाशिकमध्ये एकूण : ४४ मुहूर्त
- त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण ५३ मुहूर्त काढण्यात आले.