सिंहस्थ कुंभमेळा : शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार वार्षिक पंधरा लाख वीस हजार रुपये;
By Admin | Updated: November 21, 2014 23:54 IST2014-11-21T23:54:08+5:302014-11-21T23:54:51+5:30
स्वत:हून पुढे येण्याचे आवाहनसाधुग्रामच्या जागेचे भाडे निश्चित

सिंहस्थ कुंभमेळा : शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार वार्षिक पंधरा लाख वीस हजार रुपये;
नाशिक : साधुग्रामसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी वार्षिक पंधरा लाख वीस हजार रुपये प्रति हेक्टर असा दर जिल्हा प्रशासनाने निश्चित केला असून, शेतकऱ्यांनी जमिनी भाड्याने देण्यासाठी स्वत: पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़
साधुग्रामसाठी जागा कायमस्वरूपी संपादित करण्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी न्यायालयात २० याचिका दाखल केल्या आहेत़ त्याची सुनावणी सुरू असून, न्यायालयानेही अधिकाऱ्यांना संपादित जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या रकमेची विचारणा केली होती़ याबाबतची पुढील सुनावणी मंगळवारी (दि़ २५) होणार आहे़ दरम्यान, दरनिश्चितीसाठी जिल्हा प्रशासनाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती़ या समितीने दिलेल्या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने सहा लाख सात हजार २०० रुपये दर निश्चित केला आहे़ जमीन संपादनास उशीर झाला असल्याने प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत़ ३१ डिसेंबरपर्यंत जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असून, तेव्हापासून भाडेही सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़
संपादित जमिनींतून उभ्या फळबागा, राहती घरे व जनावरांचे गोठे वगळण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)