सिंहस्थासाठी प्रशासनाला शासनाकडून १७३ कोटी

By Admin | Updated: December 23, 2015 00:09 IST2015-12-23T00:01:43+5:302015-12-23T00:09:01+5:30

पूर्ण कामे झालेली देयके प्रदान : महापालिका अग्रेसर

For the Simhastha, the administration has received Rs 173 crore | सिंहस्थासाठी प्रशासनाला शासनाकडून १७३ कोटी

सिंहस्थासाठी प्रशासनाला शासनाकडून १७३ कोटी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा आटोपून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटलेला असताना अजूनही शासनाकडून कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या कामांसाठी निधीचे वाटप करणे सुरूच असून, अलीकडेच १७३ कोटी रुपये उपलब्ध करून देत, जी कामे पूर्ण झालेली व त्यांची उपयोगिता प्रमाणपत्रे मिळाली असतील त्यांचीच देयके अदा करण्याची अट घातली आहे.
नाशिक व त्र्यंबक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटी
रुपये खर्चाचा आराखडा मंजूर
करून त्या आधारे कामे करण्यात आली असून, ही सारी कामे सिंहस्थापूर्वीच झाल्याचा दावा
त्या त्या यंत्रणांनी केला. परंतु
कामे पूर्णत्वाचे दाखले, उपयोगिता प्रमाणपत्र देण्यास यंत्रणा
अपयशी ठरल्यामुळे त्यांचा
निधी रोखून धरण्यात आला
होता.

Web Title: For the Simhastha, the administration has received Rs 173 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.