सिंहस्थ : ४,२२० कर्मचारी आणि १,१०० बसेसचे नियोजनएसटी करणार ८० लाख भाविकांची वाहतूक
By Admin | Updated: August 19, 2014 01:20 IST2014-08-19T00:00:03+5:302014-08-19T01:20:21+5:30
सिंहस्थ : ४,२२० कर्मचारी आणि १,१०० बसेसचे नियोजनएसटी करणार ८० लाख भाविकांची वाहतूक

सिंहस्थ : ४,२२० कर्मचारी आणि १,१०० बसेसचे नियोजनएसटी करणार ८० लाख भाविकांची वाहतूक
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीसाठी यंदा ८० लाख भाविकांची वाहतूक करावी लागणार असल्याचा अंदाज परिवहन महामंडळाने व्यक्त केला आहे. मागील सिंहस्थात ४० लाख भाविकांची वाहतूक केल्यानंतर यंदा त्यात दुप्पट वाढ होईल, अशी अपेक्षा महामंडळाला आहे. या वाहतुकीतून ९ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट एसटीने ठेवले आहे.
जिल्ह्यातील दळणवळणाचे प्रमुख साधन असणाऱ्या परिवहन महामंडळाने यंदा प्रथमच दोन्हीकडच्या दोन पर्वण्या एकाच दिवशी येत असल्याचा अंदाज घेऊन केलेल्या उपाययोजनेअंतर्गत बाह्य वाहतुकीनंतर घाटापर्यंत येण्याचे अंतर किमान चार किलोमीटर असल्याने तेवढी पायपीट अनिवार्य आहे.
मागील सिंहस्थात पर्वणीकाळात १५ किलोमीटर अंतरापासून वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यामुळे भाविकांची बरीच पायपीट झाली होती. आता हेच अंतर चार किलोमीटर इतके करण्यात आल्याने भाविकांना खासगी वाहन उपलब्ध न झाल्यास तेवढे अंतर पायी कापावे लागणार आहे आणि पर्वणीकाळात होणारी गर्दी लक्षात घेता शहरात रिक्षाही फिरू शकत नाही हा अनुभव असल्याने भाविकांची मोठी पायपीट होणार असल्याचे नक्की आहे.