शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रक्ताने शिवसेनाप्रमुखांचे चित्र रेखाटण्याची सिल्व्हर ज्युबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:55 IST

नेत्याप्रती आदरभाव असतोच, कित्येकांची तर देवाइतकीच नेत्यावरही श्रद्धा असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेल्या आदरामुळे नाशिकमधील एक सामान्य शिवसैनिक विजय गवारे दरवर्षी त्यांचे चित्र स्वत:च्या रक्ताने तयार करून त्यांना भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा उपक्रम कायम असून, हा आदर व्यक्त करण्याच्या प्रयोगाचा रौप्य महोत्सव पूर्ण झाला आहे.

नाशिक : नेत्याप्रती आदरभाव असतोच, कित्येकांची तर देवाइतकीच नेत्यावरही श्रद्धा असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेल्या आदरामुळे नाशिकमधील एक सामान्य शिवसैनिक विजय गवारे दरवर्षी त्यांचे चित्र स्वत:च्या रक्ताने तयार करून त्यांना भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे. विशेष म्हणजे ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा उपक्रम कायम असून, हा आदर व्यक्त करण्याच्या प्रयोगाचा रौप्य महोत्सव पूर्ण झाला आहे.  विजय गवारे हे महापालिकेच्या सेवेत आहेत. ते मूळचे मुंबईचे. तेव्हापासूनच ते शिवसैनिक आहेत. रोजगारासाठी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर महापालिकेत भरती झाले. सध्या ते म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष आहे. बालपणापासूनच शिवसेनेविषयी आकर्षण असलेल्या गवारे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करण्यासाठी स्वत:च्या रक्ताने त्यांचे चित्र कागदावर रेखाटून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करणारा मजकूर लिहिण्याचा प्रयोग सर्व प्रथम १९९२ मध्ये राबविला. शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस म्हणजे दरवर्षी २३ जानेवारीस त्यांना अशाप्रकारचे चित्रभेट पाठविणाºया गवारे यांनी कधी कधी स्वहस्ते हे चित्र भेट दिले आहे. बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट आणि त्यांनी केलेले कौतुक स्मरणात असल्याचे गवारे सांगतात. मूळ मुंबईकर असलेल्या गवारे नाशिकमध्ये स्थायिक असले तरी त्यांच्या आईकडे ते चित्र पाठवितात, त्या मातोश्रीवर जाऊन चित्र भेट देतात. २०१४ मध्ये शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले. परंतु गवारे यांची भक्ती कमी झालेली नाही. दरवर्षी ते रक्ताने चित्र काढून पाठवत असतात. मुळात त्यांच्या लेखी शिवसेनाप्रमुख अमर असल्याने भावनिकदृष्ट्या ते समर्थन करतात.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे