भूखंडांच्या दरवाढीवर औद्योगिक संघटनांचे मौन

By Admin | Updated: March 16, 2016 08:28 IST2016-03-16T08:28:00+5:302016-03-16T08:28:02+5:30

भूखंडांच्या दरवाढीवर औद्योगिक संघटनांचे मौन

Silence of industrial organizations on plots of plots | भूखंडांच्या दरवाढीवर औद्योगिक संघटनांचे मौन

भूखंडांच्या दरवाढीवर औद्योगिक संघटनांचे मौन

नाशिक : नवीन उद्योग नाशिकमध्ये आणण्यासाठी शासन आणि मोठ्या उद्योगांना निमंत्रण देणाऱ्या शहरातील उद्योजकांच्या संघटनांनी एमआयडीसीच्या दरवाढीवर मौन बाळगले असून, दर कमी करावे किंवा अन्य कोणत्याही मागण्या केल्या जात असल्याने औद्योगिक संघटनांची सुस्त भूमिका औद्योगिक विकासावर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांत नाशिकमध्ये नवीन उद्योग आलेला नाही, की मोठी गुंतवणूक झालेली नाही. अपवाद फक्त काही कंपन्यांच्या विस्तारीकरणाचा. महिंद्रा आणि बॉशने केलेल्या गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त नाव घ्यावे, असा एखादा मोठा उद्योग दाखल झालेला नाही. राज्य शासनाकडून वाढविले जाणारे औद्योगिक दर, सरकारी दराच्या ऐवजी बाजारभावाशी समकक्ष दराने होत असलेले सरकारी अधिकाऱ्यांचे व्यवहार आणि भूखंड वाटपात होणारी दिरंगाई या सर्वांचा औद्योगिक विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. परंतु अशा विषयावर औद्योगिक संघटनांकडून चकार शब्द काढला जात नाही.
आताही गेल्या ७ जानेवारीपासून राज्यातील सर्वच औद्योगिक भूखंडांची दरवाढ झाली असून नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली असताना त्यावर औद्योगिक संघटनांनी मौन बाळगले आहे.भूखंडांच्या दरवाढीवर

Web Title: Silence of industrial organizations on plots of plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.