नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

By Admin | Updated: August 11, 2014 00:43 IST2014-08-10T21:32:00+5:302014-08-11T00:43:29+5:30

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

Signs of epilepsy dengue fever | नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

नांदगावी डेंग्यूच्या उद्रेकाची लक्षणे

 

नांदगाव : शहर व परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, जोडीला मलेरियाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून, सध्या किमान ५० ते ६० रुग्ण डेंग्यूग्रस्त झाल्याची माहिती आहे.
गुरुकृपानगरात कल्याणी खैरनार(१४), वैष्णवी जगधने(७), मनोज सरोदे(१८), ओम गुमनार (७), रामदास केसकर(३२), साई खैरनार(४) यांना डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे.
नांदगाव शहरातील डॉ. गणेश चव्हाण, डॉ. आनंद पारख, डॉ. सुनील तुसे, डॉ. यशवंत जाधव,
डॉ. वानखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रोहन बोरसे यांनी मलेरिया व डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झाली असल्याचे सांगितले.
डॉ. चव्हाण यांच्याकडे उपरोल्लेखित गुरुकृपानगरातील काही अत्यवस्थ रुग्ण उपचारासाठी दाखल होते.
मात्र प्लेटलेटसची संख्या झपाट्याने कमी झाल्याने त्यांना मालेगाव व इतरत्र हलविण्यात
आले आहे. डॉ. बोरसे यांनी हिसवळच्या नयना देशमुख व गुरुकृपानगरातील तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने डेंग्यू चाचणीसाठी
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविले असून, मंगळवार(दि.१२) पर्यंत त्याचे अहवाल प्राप्त होतील.
तालुक्यातील नांदूरचे दत्तात्रय मोरे(२२), कोंढारची सुलेखा नाईकवाडे(३५), हिसवळ बुद्रूकची गौरी साळुंके(५) हे डेंग्यू संशयित आहेत. कासारी, जळगाव बुद्रूक, हिसवळ, मूळडोंगरी येथील रुग्ण मलेरिया व डेंग्यू संशयित आहेत. डेंग्यूबाधित ओळखण्यासाठी आयजीजी, आयजीएम व एनएसएक या चाचण्यांचे अहवाल महत्त्वाचे ठरतात. आयजीजी चाचणी पॉझिटिव्ह असली की, लागण एका आठवड्यातली असते. आयजीएम चाचणी पॉझिटिव्ह आली की, लागण दोन आठवड्यांपूर्वी झाली असे सामान्यत डॉक्टर्स गृहीत धरतात. मात्र शासकीय यंत्रणा पुणे येथून अहवाल आल्याशिवाय डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे असे मानत नाही.
यात हिमोग्लोबीन, प्लेटलेटस व पांढऱ्यापेशींच्या संख्येचे मापन आवश्यक असते. उपचारासाठी येणारा खर्च अनेकदा अर्धा लक्ष रुपयांच्या घरात जात असल्याने सामान्यांच्या तो आवाक्याबाहेर जातो.
नगरपालिका, पंचायत समिती या संस्थांनी तातडीने धुरळणी व फवारणी हाती घ्यायला हवी. तसेच साफसफाईची मोहीम राबवून जनतेला काळजी घेण्याविषयी समुपदेशन करणे गरजेचे आहे. लागणीचे स्वरूप साथीमध्ये रुपांतरित होऊ नये यासाठी किमान वरील खबरदारीचे उपाय तातडीने करणे आवश्यक आहे.
महिनाभरापूर्वी तालुक्यात जळगाव बुद्रूक येथील डेंग्यूसदृश व मलेरिया रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती.
(वार्ताहर)

Web Title: Signs of epilepsy dengue fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.